Marathi translation of 'Think On These Things
या गोष्टींचा विचार करा (Think on These Things)
शतकातील सर्वोत्कृष्ट शंभर धार्मिक पुस्तकांपैकी एक’ म्हणून पॅराबोला मासिकाच्या वतीने निवडण्यात आलेले हे पुस्तक आहे. युवक आणि प्रौढांना कृष्णमूर्तींच्या शिकवणीची यात उत्कृष्टपणे ओळख करून देण्यात आली आहे. कृष्णमूर्तींची प्रवचने, तसेच त्यांनी भारतातील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी केलेल्या चर्चांचा समावेश असलेले हे पुस्तक जगातील सर्व प्रमुख भाषांमध्ये अनुवादित झाले आहे. मानवी जीवनाच्या उद्देशापासून शिक्षणाचे कार्य वेगळे नाही, हे निर्विवाद सत्य कृष्णमूर्तींनी इथे स्पष्ट करून सांगितले आहे.
प्रकाशक : साकेत प्रकाशन, पृष्ठे : २५६, भाषांतर : दिवाकर घैसास
इतर भाषांमधील आवृत्त्या : हिंदी, बंगाली, कन्नड, ओरिया, तामीळ, तेलगू